Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 5.5

प्रकाशन टिपा

प्रकाशन टिपा

Logo

Red Hat Engineering Content Services

Legal Notice

Copyright © 2010 Red Hat.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
RaleighNC 27606-2072 USA
Phone: +1 919 754 3700
Phone: 888 733 4281
Fax: +1 919 754 3701
PO Box 13588 Research Triangle ParkNC 27709 USA

Abstract
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 5.5 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 5 कार्य प्रणाली व या प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ऍप्लिकेशन्स् करीता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करते. किर्कोळ प्रकाशनातील सर्व बदलांचे तपशील टिपा तांत्रीक टिपांमध्ये उपलब्ध आहे.
Red Hat Enterprise Linux 5.5 प्रकाशनात Intel Boxboro-EX प्लॅटफॉर्म, AMD Magny-Cours प्रोसेसर व IBM Power 7 प्रोसेसर करीत हार्डवेअर सक्षम केले आहे.वर्च्युअलाइजेशन सुधारीत केले आहे, एकापेक्षा जास्त 10 GigE SR-IOV कार्डस् करीता समर्थन, व प्रणालीवर सुरू केल्यावर वर्च्युअल गेस्ट स्मृतीकरीता ह्यूजपेज्सचा स्वयं वापर समाविष्टीत आहे. इंटर ऑपरेबिलिटी सुधारणांमध्ये OpenOffice करीता Microsoft Office 2007 फिल्टर्स्, Windows 7 सहत्वतासाठी Samba सुविधा व Microsoft आधारीत PXE सेवांचा वापर करून वर्च्युअल मशीनकरीता बूट समर्थन समाविष्टीत आहे.

1. प्रतिष्ठापन

Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये प्रणालीच्या इंस्टॉलर (ऍनाकाँडा) साठी अनेक बगफिक्सेस् व सुधारणा समाविष्टीत आहे.
परस्पर संवाद इंस्टॉलर सुधारीत केले आहे, NFS स्रोत पासून प्रतिष्ठापन करतेवेळी (BZ#493052) अगाऊ नेटवर्क फाइल सिस्टम (NFS) माऊंट पर्याय निर्देशीत करण्याची क्षमता समावेश केले आहे. तसेच, प्रतिष्ठापन स्रोत (उ.दा. किकस्टार्ट फाइल्स्) जे पासवर्ड सुरक्षीत फाइल ट्रांसफर प्रोटोकॉल (FTP) सर्व्हर्स् येथे स्थीत असते आत्ता प्रतिष्ठापनवेळी प्राप्त केले जाऊ शकते (BZ#505424).
किकस्टार्ट
किकस्टार्ट वापरकर्त्यांना Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापन स्वयं करण्यास पर्याय पुरवते. किकस्टार्टचा वापर करून, प्रणाली प्राशासक एक फाइल निर्माण करतो ज्यांत ठराविक प्रतिष्ठापनवेळी आढळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे समाविष्टीत असते.
किकस्टार्ट डीबगींग व त्रुटी अहवाल सुधारीत केले आहे. इंस्टॉलर आत्ता किकस्टार्ट स्क्रिप्टलेटस् डीबगींगवेळी सुरक्षीत करतो, स्टँडर्ड आऊटपुट (stdout) व स्टँडर्ड एरर (stderr) स्ट्रीम्स् लॉग करतो, व anaconda.log करीता संदेश लॉग करतो (BZ#510636).
स्वतंत्र संकुल ज्याप्रकारे वगळले जातात त्याच प्रकारे आत्ता संकुल गट किकस्टार्ट प्रतिष्ठापनात वगळले जातात (BZ#558516). तसेच, bootloader आदेश आत्ता --hvargs घटक करीता समर्थन पुरवतो, ज्यामुळे किकस्टार्ट प्रतिष्ठापनवेळी Xen हायपरवाइजर घटकांना परवानगी देणे शक्य होते (BZ#501438).
पूर्वी, सर्व संकुलांची नीवड करण्यासाठी किकस्टार्ट प्रतिष्ठापन पद्धत दोन पर्याय @Everything* (वाईल्डकार्ड) पुरवत असे. Red Hat Enterprise Linux 5.5 पासून, दोन्ही पर्याय वापरणीत नाही. किकस्टार्ट फाइलमध्ये मतभेदीय संकुलांकरीता संकुल वगळणी समावेश करेपर्यंत, सर्व संकुल पर्याय नीवडण्याचा प्रयत्न अपयशी ठरेल. तरी, सर्व मतभेदीय संकुले वगळता सर्वे संकुले प्रतिष्ठापीत करण्यासाठी, किकस्टार्ट फाइलमध्ये खालील असणे आवश्यक आहे:
 %packages @Everything -@Conflicts
Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये नवीन संकुल संच samba3x, freeradius2, postgres84 समाविष्टीत आहे. हे संकुल संच फक्त प्रणाली प्रतिष्ठापनवेळी किकस्टार्ट द्वारे किंवा सध्याच्या प्रणालीसाठी yum द्वारे सेट केले जाते.
हार्डवेअर समर्थन
खालील डिव्हाइस ड्राइव्हर्स् आत्ता प्रतिष्ठापनवेळी समर्थीत केले जाते:
  • PMC Sierra MaxRAID कंट्रोलर अडॅप्टर्स् करीता pmcraid ड्राइव्हर (BZ#532777)
  • Power6 Virtual FC उपकरणांसाठी ibmvfs ड्राइव्हर (BZ#512237).
  • Brocade फायबर चॅनल ते PCIe होस्ट बस अडॅप्टर्स् करीता bfa ड्राइव्हर (BZ#475707)
  • ServerEngines BladeEngine 2 Open iSCSI उपकरणांसाठी be2iscsi ड्राइव्हर (BZ#529442).

Note

प्रतिष्ठापनविषयी तपशील माहितीकरीता, प्रतिष्ठापन पुस्तिका Red Hat Enterprise Linux 5 कसे प्रतिष्ठापीत करायचे यावर दस्तऐवजीकरण पुरवते.

2. वर्च्युअलाइजेशन

Red Hat Enterprise Linux 5.5 वर्च्युअलाइजेशन करीता एकापेक्षा जास्त सुधारणा पुरवतो. वर्च्युअलाइजेशन घटकांकरीता सर्व बदलांविषयी तपशील टिपण्णींकरीता तांत्रीक टिपा पहा.

Note

क्लस्टर संचचा वापर करून KVM आधारीत वर्च्युअल अतिथींचे व्यवस्थापन आत्ता संपूर्णपणे समर्थीत आहे.

SPICE

Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये सिम्पल प्रोटोकॉल फॉर इंडिपेंडंट कमप्यूटींग एन्वार्यनमेंटस् (SPICE) रिमोट डिस्पले प्रोटोकॉलकरीता क्षमता पुरवणारे घटक समाविष्टीत आहे. या घटकांचा वापर, Red Hat Enterprise Virtualization उत्पादनसह एकत्रपणे केला जातो व स्थीर ABI ची खात्री देत नाही. घटकांना Red Hat Enterprise Virtualization उत्पादनाच्या कार्यरत आवश्यकतांसह समजुळवणी केले जाईल. भविष्यातील प्रकाशनकरीता स्थानांतरनसाठी प्रत्येक-प्रणाली आधारीत मानवीय बदल करणे आवश्यक ठरू शकते.
PCI पासथ्रू सुधारणा
PCI पासथ्रू PCI उपकरणांना दाखवण्यास व ते अतिथी कार्यप्रणालीसह प्रत्यक्षात जुळले आहे असे वर्तन करण्यास परवानगी देते. KVM व Xen हायपरवाइजर्स् वर्च्युअलाइज्ड् अतिथीसह यजमान प्रणालीवर PCI उपकरणांना जोडण्याचे समर्थन पुरवते.
AMD इंपुट/आऊटपुट मेमरी मॅनेजमेंट यूनीट (IOMMU) कर्नल ड्राइव्हर, जे PCI पासथ्रूकरीता समर्थन पुरवते, त्यांस सुधारीत करण्यात आले आहे. या सुधारणामुळे प्रणाली व्यवस्थापन विनंती अयोग्यरित्या हाताळणी, या अडचणीचे आत्ता निवारण शक्य झाले आहे. (BZ#531469)
KVM हायपरवाइजर वरील Intel VT-d एक्सटेंशनचा वापर करून आत्ता PCI पासथ्रूकरीता समर्थन सुधारीत केला आहे. उपकरणे (एकतर फिजीकल किंवा वर्च्युअल) आत्ता बंद करणे व रनटाइमवेळी अतिथीपासून वेगळे होणे शक्य आहे, यामुळे दुसऱ्या अतिथीकरीता उपकरणाचे वाटप करणे शक्य होते. हे पुनः वाटप लाइव्ह करणे शक्य आहे (BZ#516811). तसेच, 1:1 मॅपींग कार्यक्षमता देखील सुधारीत केली आहे (BZ#518103).

Note

वर्च्युअलाइजेशनसाठी तपशील माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux वरील वर्च्युअलाइजेशन करीता वर्च्युअलाइजेशन पुस्तिका योग्य पुस्तिका आहे.
ह्यूजपेजेस् समर्थन
hugetlbfs (ह्यूजपेजेस्) सुरू करण्यासाठी libvirt मध्ये नवीन नीयम उपलब्ध आहे. प्रणालीला ह्यूजपेजेस् सह संरचीत केल्यास, libvirt स्वयं hugetlbfs पासून मेमरी पुनः वर्च्युअल अतिथीच्या मेमरीकरीता वाटप करतो. हार्डवेअरवरील एक्सटेंडेड पेज टेबल्स् व नेस्टेड पेज टेबल्स् सह एकत्र केल्यास, अतिथी द्वारे लक्षणीय कार्यक्षमता सुधारणा प्राप्त होऊ शकते. (BZ#518099)

3. कर्नल

3.1. कर्नल प्लॅटफॉर्म समर्थन

या प्रकाशनात Intel च्या नवीन प्लॅटफॉर्मस्, कोड-नाव Boxboro-EXBoxboro-MC, AMD च्या नवीन प्रोसेसर फॅमिली, कोड-नाव Magny-Cours व IBM च्या Power7 प्रोसेसर करीता समर्थन समाविष्टीत आहे.

3.2. कर्नलचे जेनेरीक गुणविशेष

विना इंटरअप्ट स्लीप स्टेट् मधील व्यस्थ कर्नल कार्ये ओळखत आहे
काहिक घटनांमध्ये, कर्नलमधील कार्ये नेहमीकरीता विना इंटरप्ट स्लीप स्टेट (D-स्टेट) मध्ये प्रवेश करू शकते, ज्यामुळे प्रणालीला बंद करणे असंभव होते. या सुधारणासह, अडकलेले कार्य ओळखा (Detect Hung Task) कर्नल थ्रेड समावेश केले आहे, जे D-स्टेट मध्ये नेहमीकरीता फसलेल्या कार्यांना ओळखण्यास मदत करते.
हे नवीन गुणविशेष CONFIG_DETECT_HUNG_TASK कर्नल फ्लॅग द्वारे नियंत्रीत केले जाते. "y" करीता सेट केल्यास D-स्टेटे मधील कार्य ओळखले जातात; n करीता सेट केल्यास गुणविशेष अक्षम होते. CONFIG_DETECT_HUNG_TASK फ्लॅग करीता पूर्वनिर्धारीत मूल्य y आहे.
तसेच, CONFIG_BOOTPARAM_HUNG_TASK_PANIC फ्लॅग समावेश केले आहे. y करीता सेट केल्यास, D-स्टेट मध्ये अडकलेले कार्य आढळल्यास कर्नल पॅनीक निर्माण होते. CONFIG_BOOTPARAM_HUNG_TASK_PANIC फ्लॅग करीता पूर्वनिर्धारीत मूल्य n आहे.
स्वाक्षरीत s390 कर्नल विभाग
Red Hat Enterprise Linux 5.5 पासून, सर्व s390 कर्नल मॉड्यूअल्स् आत्ता स्वाक्षरीत केले आहेत. BZ#483665

4. डिव्हाइस ड्राइव्हर्स्

HP iLO/iLO2 व्यवस्थापन प्रोसेसर्स् करीता hpilo ड्राइव्हर सुधारीत करण्यात आले आहे.
ऍडवांस्ड् Linux साऊंट आर्किटेक्चर (ALSA) सुधारीत केले आहे — हाय डेफिनेशन ऑडिओ (HDA) करीता सुधारीत समर्थन पुरवतो. (BZ#525390).
SB900 SMBus कंट्रोलरकरीता i2c उपकरण ड्राइव्हर समर्थनसह iic-बस संवाद सुधारीत केले आहे. (BZ#516623)
Mellanox ConnectX HCA InfiniBand उपरणांसाठी mlx4 ड्राइव्हर आवृत्ती 1.4.1 करीता सुधारीत केले आहे (BZ#514147 BZ#500346)

4.1. नेटवर्क डिव्हाइस ड्राइव्हर्स्

वायरलेस रिबेस
Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये वायरलेस ड्राइव्हर्स् व कर्नलमधील उपप्रणालींसाठी मुख्य सुधारणा समाविष्टीत आहे.
Intel वायरलेस नेटवर्क अडॅप्टर्स् करीता iwlwifi ड्राइव्हर्स् सुधारीत केले आहे. या हार्डवेअर लाइनमधील उपकरणे 802.11a, 802.11b, 802.11g, व 802.11n वायरलेस प्रोटोकॉल्स् करीता समर्थन पुरवतात. ही सुधारणा iwl6000iwl1000 उपकरणांसाठी नवीन समर्थन, तसेच iwl5000, iwl4965iwl3945 उपकरणांसाठी सुधारीत समर्थन पुरवतात.
rt2x00 वायरलेस उपकरणांसाठी ड्राइव्हर्स् सुधारीत केले आहे. ही सुधारणा Ralink rt2400pci, rt2500pci, rt2500usb, rt61pcirt73usb चिपसेटस् , तसेच rtl8180rtl8187 Realtek करीता ड्राइव्हर्स् सुधारीत करते .
Atheros 802.11n वायरलेस LAN अडॅप्टर्स् करीता ath9k ड्राइव्हर समर्थीत केले आहे.
या ड्राइव्हर्स्च्या गुणविशेषकरीता समर्थन पुरवण्यासाठी, mac80211cfg80211 कर्नल उपप्रणाली सुधारीत केले आहे.
Solarflare ड्राइव्हर
Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये, Solarflare ड्राइव्हर (sfc) समावेश केले आहे (BZ#448856)
Neterion चे X3100 Series 10GbE PCIe ड्राइव्हर
Neterion's X3100 Series 10GbE PCIe उपकरणांसाठी vxge ड्राइव्हर सुधारीत करण्यात आले आहे (BZ#453683).
ServerEngines BladeEngine2 10Gbps ड्राइव्हर
ServerEngines BladeEngine2 10Gbps नेटवर्क उपरकरणांसाठी be2net ड्राइव्हर सुधारीत केले आहे (BZ#549460)
Cisco 10G Ethernet ड्राइव्हर
Cisco 10G Ethernet उपकरणांसाठी enic ड्राइव्हर आवृत्ती 1.1.0.100 करीता सुधारीत केले आहे. (BZ#519086 BZ#550148)
QLogic 10 Gigabit PCI-E इथरनेट ड्राइव्हर
QLogic 10 Gigabit PCI-E इथरनेट उपकरणांसाठी qlge ड्राइव्हर आवृत्ती 1.00.00.23 करीता सुधारीत केले आहे. (BZ#519453)
QLogic Fibre Channel HBA ड्राइव्हर
QLogic Fibre Channel HBA उपकरणांसाठी qla2xx ड्राइव्हर सुधारीत केले आहे. (BZ#542834 BZ#543057)
Broadcom Tigon3 इथरनेट उपकरणे
Broadcom Tigon3 इथरनेट उपकरणांसाठी tg3 ड्राइव्हर सुधारीत केले आहे. (BZ#515312)
Intel Gigabit इथरनेट नेटवर्क डिव्हाइसेस्
Intel Gigabit Ethernet Network उपकरणांसाठी igb ड्राइव्हर सुधारीत करण्यात आले आहे. (BZ#513710)
Intel 10 Gigabit PCI एक्सप्रेस् नेटवर्क डिव्हाइसेस्
Intel 10 Gigabit PCI Express Network उपकरणांसाठी ixgbe ड्राइव्हर सुधारीत केले आहे. (BZ#513707, BZ#514306, BZ#516699)
Intel PRO/1000 नेटवर्क डिव्हाइसेस्
Intel PRO/1000 नेटवर्क उपकरणांकरीता e1000 ड्राइव्हर सुधारीत करण्यात आले आहे (BZ#515524)
NetXen मल्टी पोर्ट (1/10) Gigabit नेटवर्क डिव्हाइसेस्
NetXen Multi port (1/10) Gigabit Network उपकरणांसाठी netxen ड्राइव्हर सुधारीत करण्यात आले आहे. (BZ#542746)
Broadcom Everest नेटवर्क उपकरणे
Broadcom Everest नेटवर्क उपकरणांसाठी bnx2x ड्राइव्हर आवृत्ती 1.52.1-5 करीता सुधारीत केले आहे.(BZ#515716, BZ#522600)
Broadcom NetXtreme II नेटवर्क उपकरणे
Broadcom NetXtreme II नेटवर्क उपकरणांसाठी bnx2 ड्राइव्हरला आवृत्ती 2.0.2 करीता सुधारीत केले आहे(BZ#517377)
Broadcom NetXtreme II iSCSI
Broadcom NetXtreme II iSCSI साठी bnx2i ड्राइव्हर सुधारीत केले आहे(BZ#516233)
RealTek 8169 इथरनेट ड्राइव्हर
RealTek 8169 इथरनेट उपकरणांसाठी r8169 ड्राइव्हर सुधारीत केले आहे. (BZ#514589)

4.2. स्टोरेज डिव्हाइस् ड्राइव्हर

QLogic फायबर चॅनल होस्ट बस्
QLogic Fibre Channel Host Bus Adapters करीता qla2xxx ड्राइव्हर आवृत्ती 8.03.01.02.05.05-k करीता सुधारीत केले आहे (BZ#519447)
HighPoint RocketRAID 3xxx/4xxx
HighPoint RocketRAID 3xxx/4xxx कंट्रोलर्स् करीता hptiop ड्राइव्हर्स् सुधारीत केले आहे, ज्यामुळे RR44xx अडॅप्टर्स् करीता समर्थन प्राप्त होते. (BZ#519076)
Emulex फायबर चॅनल होस्ट बस्
Emulex Fibre Channel Host Bus Adapters करीता lpfc ड्राइव्हर आवृत्ती 8.2.0.52 साठी सुधारीत केले आहे. (BZ#515272) BZ#549763
LSI SAS-2 अडॅप्टर्स्ची फॅमिली
LSI पासून SAS-2 अडॅप्टर फॅमिलीकरीता mpt2sas ड्राइव्हर आवृत्ती 02.101.00.00 याप्रमाणे सुधारीत केले आहे. यामुळे अनेक अडचणीचे निवारण शक्य होते, जसे की:
  • बाहेरच्या खंडांकरीता घटनांना वगळता, खंड समावेश किंवा काढून टाकल्यावर सॅनिटी चेक्स् (तपासणी) समावेश केले आहे.
  • ड्राइव्हर आत्ता विना लेगसी I/O पोर्ट उपलब्ध आहे
  • हायबरनेशन किंवा पुनःसुरू करतेवेळी आढळलेली अडचण कर्नल ऊप्स् करीता कारणीभूत ठरले असावे.
LSI Fusion MPT
LSI Fusion MPT फर्मवेअरचा वापर करणाऱ्या उपकरणांसाठी mptque बेस ड्राइव्हर आवृत्ती 3.4.13rh करीता सुधारीत केले आहे. या सुधारणामुळे अनेक अडचणींचे निवारण होते, शक्यतया:
  • सिरीअल अटॉच्ड् SCSI (SAS) मांडणी तपास पुनः संरचीत केला आहे, ज्यामुळे एक्सपँडर, दुवा स्थिती व होस्ट बस अडॅप्टर (HBA) घटना समावेश केले जातात.
  • SAS केबल काढून टाकणे व पुनःअंतर्भूत केल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी.
  • अडचण जेथे SATA उपकरणांना वेगळे SAS पत्ते प्राप्त होत, याचे आत्ता निवारण झाले आहे.
  • डिव्हाइस फर्मवेअर क्यू फूल इव्हेंट (घटना) आत्ता ड्राइव्हरला कळवतो व ड्राइव्हर SCSI मध्य-स्तरचा वापर करून क्यू फूल घटना हाताळतो.
LSI MegaRAID SAS कंट्रोलर्स्
LSI MegaRAID SAS कंट्रोलर्स् करीता megaraid_sas ड्राइव्हर आवृत्ती 4.17-RH1 करीता सुधारीत केले आहे. ही सुधारणा अनेक अडचणीचे निवारण करतो, जसे की:
  • फर्मवेअर बूट व प्रारंभवेळी अडचणीचे निवारण झाले आहे.
  • हायबरनेशनवेळी उपकरणे स्तब्ध करणाऱ्या अडचणीचे आत्ता निवारण झाले आहे.
  • समावेश किंवा नष्ट केल्यावर ड्राइव्हर आत्ता उपकरणांची सुधारणा स्वयं करतो.
  • MegaRAID SAS ड्राइव्हर आत्ता लेगसी I/O पोर्ट अक्षम आहे

5. फाइलप्रणाली/स्टोरेज व्यवस्थापन

सुधारीत CFQ I/O शेड्यूअलर क्षमता
I/O विनंती एकापेक्षा जास्त प्रोसेस् किंवा थ्रेडस् करीता वितरीत करून, काहिक ऍप्लिकेशन्स् (उ.द. dumpnfsd) डिस्क I/O कार्यक्षमता सुधारीत करण्याचा प्रयत्न करतात. तरी, Completely Fair Queuing (CFQ) I/O शेड्यूलरचा वापर करतेवेळी, या ऍप्लिकेशनचा I/O कार्यक्षमतावर काहिच प्रभाव पडला नाही. Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये, कर्नल आत्ता क्यूऊज् ओळखू व एकत्र करू शकते. तसेच, क्यूऊजचे संवाद साधण्यास असहाकार्य, व त्यांना पुनः विभाजीत करणे देखील ओळखले जाते.
नवीन GFS2 माऊंट पर्याय
या सुधारणामध्ये errors= माऊंट कमांड लाइन पर्यायसाठी GFS2 समर्थन समाविष्ट केले आहे, ज्याचा वापर त्रुटी निवारणमध्ये होऊ शकतो. पूर्वनिर्धारीत पर्याय, errors=withdraw मुळे I/O त्रुटी किंवा मेटाडेटा त्रुटी आढळल्यावर, क्लस्टर पासून फाइल प्रणाली रद्द करण्याची भिती निर्माण होते. वैकल्पिकरित्या, errors=panic मुळे त्याच परिस्थितीत पॅनीक निर्माण होतो. (BZ#518106)
CIFS सुधारणा
कर्नलमध्ये कॉमन इंटरनेट फाइल सिस्टम (CIFS) सुधारीत केले आहे. (BZ#500838)

6. उपकरणे

6.1. GNU प्रोजेक्ट डीबगर (GDB)

GNU प्रोजेक्ट डीबगर (सहसा यांस GDB म्हटले जाते) C, C++, व इतर भाषांमध्ये लिहीलेले प्रोग्राम यांस नियंत्रीत पद्धतीने एक्जीक्यूट करून डीबग करतो, व त्यांतील डाटाची छपाई करतो.
Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये, GDB यांस आवृत्ती 7.0.1 करीता सुधारीत केले आहे. बदलांच्या तपशील सूचीकरीता तांत्रीक टिपांमधील GDB विभाग पहा.
सुधारीत C++ समर्थन
GDB मध्ये C++ प्रोग्रामींग भाषासाठी समर्थन सुधारीत केले आहे. महत्वाच्या सुधाणांमध्ये खालील समाविष्टीत आहे:
  • एक्सप्रेशन पार्सींगसाठी अनेक सुधारणा.
  • टाइप नेमस्ची उत्तम हाताळणी.
  • अगाऊ क्वोटिंगची आवश्यकता जवळपास वगळण्यात आली आहे
  • इन्फिरीअर द्वारे एक्सेप्ट्शन आढळल्यावरही "next" व इतर स्टेपींग आदेश योग्य प्रकारे कार्य करते.
  • GDB मध्ये नवीन "catch syscall" आदेश समाविष्टीत आहे. याचा वापर सिस्टम् कॉल केल्यावर इन्फिरीअर थांबवण्यासाठी होतो.
वाईड व मल्टि-बाईट अक्षर समर्थन
GDB मध्ये आत्ता लक्ष्यकरीता नवाईड व मल्टि-बाईट अक्षरांसाठी समर्थन पुरवले जाते.
स्वतंत्र थ्रेड डीबगींग
थ्रेड एक्जीक्यूशन आत्ता स्वतंत्रपणे थ्रेडचे डीबगींग व प्रत्येकाशी थ्रेड डीबगींग करण्यास परवानगी देतो; तसेच नवीन संरचना "set target-async" व "set non-stop" सह समर्थीत आहे.

6.2. SystemTap

SystemTap ट्रेसींग व प्रोबींग उपकरण आहे जे वापरकर्त्यांना कार्य प्रणालीतील (ठराविकपणे, कर्नल) कार्यांचा तपशील अभ्यास व नियंत्रण करण्यास परवानगी देते. आऊटपुट netstat, ps, top, व iostat; उपकरणांप्रमाणेच पुरवले जाते. तरी, SystemTap ची रचना आणखी फिल्टरींग व माहिती गोळा करण्यासाठी पर्याय पुरवण्यासाठी केली आहे.
नवीन कर्नल ट्रेसपॉईंटस्
ट्रेसपॉईंट्स् कर्नलच्या महत्वाच्या विभागात स्थीत केले जाते, ज्यामुळे प्रणाली प्रशासकांना कोडचे भाग विश्लेषीत, व डीबग करण्यास परवानगी मिळते. Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये, कर्नलमध्ये बहुतांश ट्रेसपॉईंट्स् समाविष्ट करण्यात आले आहे (BZ#475710), नेटवर्किंग करीता ट्रेसपॉईंट (BZ#475457), कोरडंप (BZ#517115) व सिगनल समाविष्टीत आहे (BZ#517121).

Note

कर्नलमधील उपलब्ध ट्रेसपॉईंटची सूची खालील प्रमाणे प्राप्त होऊ शकते:
 stap -L 'kernel.trace("*")'|sort
परवानगी अशक्य मोड
पूर्वी, फक्त रूट परवानगी असणारे वापरकर्ते SystemTap चा वापर करू शकत असे. या सुधारणात SystemTap चे परवानगी अशक्य मोड समाविष्ट केले आहे, ज्यामुळे विना रूट वापरकर्ते SystemTap चा वापर करू शकतात. परवानगी अशक्य विषयी तपशील माहितीकरीता man stap-client मॅनपेज पहा.

Important

परवानगी अशक्य मोड तंत्रज्ञाण पूर्वावलोकन म्हणून Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये गृहीत धरले जाते. सुरक्षा सुधारीत करण्यासाठी stap-server सुविधावर काम चालू आहे व नेटवर्कवर काळजीपूर्वक वितरीत केले पाहिजे.
C++ प्रोबींग
C++ प्रोग्राम प्रोबींग सुधारणा युजेर-स्पेस् कार्यक्रमचे उत्तम प्रोबींग करीता परवानगी पुरवतो.

6.3. Valgrind

Valgrind चा वापर स्मृती वाचन, लेखन, व वाटप कार्यांसाठी केला जातो. वॅलग्रींड उपकरण वारंवार डेव्हलप्हर्स् द्वारे स्मृती व्यवस्थापन अडचणींचे विश्लेषण व डीबग करीता वापरले जाते.
Valgrind आवृत्ती 3.5.0 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुलळे अनेक प्रणाली आर्किटेक्चर्सकरीता सुधारीत समर्थन पुरवले जाते. या सुधारणामुळे Valgrind च्या क्षमता, परिमाणता, व वापरणीकरीता बरेच सुधारणा समाविष्टीत केले आहेत. ठराविकपणे, Helgrind उपकरणाचे वापर व परिमाणता — ज्याचा वापर रेस कंडीशन ओळखण्यासाठी होतो — सुधारीत केले आहे. Memcheck उपकरणाची लीक तपासणी क्षमता देखील सुधारीत केली आहे. तसेच, DWARF डीबगींग माहितीकरीता समर्थन सुधारीत करण्यात आले आहे.

7. डेस्कटॉप सुधारणा

OpenOffice.org
OpenOffice.org ओपन सोअर्स्, मल्टी-प्लॅटफॉर्म ऑफिस प्रोडक्टिविटी संच आहे. यात मूळ डेस्कटॉप ऍप्लिकेशन्स्, जसे की वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, व प्रस्तुती व्यवस्थापन समाविष्टीत आहे. OpenOffice.org सुधारीत केले आहे, ज्यांत अनेक बग निवापरण व सुधारणा समाविष्टीत आहे, तसेच Microsoft Office 2007 OOXML रूपण करीता समर्थन देखील समाविष्टीत आहे.
मेटासिटी
Metacity, GNOME डेस्कटॉपसाठी पूर्वनिर्धारीत पटल व्यवस्थापक सुधारीत केले आहे, ज्यामुळे सुधारणा, metacity व बग निवारणाचे वर्तन नियंत्रीत करण्यासाठी अगाऊ GConf किज् पुरवले जातात.

8. नवीन संकुले

FreeRADIUS
FreeRADIUS उच्च-कार्यक्षमता, जास्त संरचनाजोगी, फ्री रिमोट ऑथेंटिकेशन डायल इन यूजर सर्व्हिस (RADIUS) सर्व्हर आहे. त्याची रचना नेटवर्कसाठी केंद्रिय ऑथेंटिकेशन व नेटवर्ककरीता ओळख पटवणे समाविष्टीत आहे.
FreeRADIUS 2.0 नवीन संकुल (freeradius2) म्हणून Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये उपलब्ध केले आहे. FreeRADIUS 1 अजूनही Red Hat Enterprise Linux 5 मध्ये मूळ स्वरूप म्हणजेच freeradius संकुल म्हणून पुरवले जाते. FreeRADIUS च्या आवृत्ती 2.0 मध्ये अनेक नवीन गुणविशेष जसे की प्रोग्रामींग भाषा unlang, वर्च्युअल सर्व्हर समर्थन, सुधारीत RFC व्याप्तीसाठी अगाऊ डिरेक्ट्रीज् व संपूर्ण IPv6 समर्थन दोन्ही गुणविशेष & नेटवर्क पॅकेट्स् करीता समाविष्टीत आहे.

Important

freeradiusfreeradius2 संकुल सामान्य फाइल्स् शेअर करतात, व एकाचवेळी प्रणालीवर प्रतिष्ठापीत करणे शक्य नाही.
PostgreSQL 8.4
PostgreSQL 8.4 (postgresql84) यांस Red Hat Enterprise Linux 5 मध्ये आत्ता संपूर्णतया समर्थीत पर्याय म्हणून समावेश केले आहे. PostgreSQL 8.4 मधील नवीन गुणविशेषमध्ये खालील समाविष्टीत आहे: पॅरलल डाटाबेस पूर्वस्थिती, दर-कॉलम करीता परवानगी व नवीन नीयंत्रण उपकरणे समाविष्टीत आहे.

Important

सध्याच्या PostgreSQL 8.1 (postgres संकुल द्वारे) पासून स्थानांतरनसाठी pg_dump चा वापर करून डाटा डंप व पूर्वस्थिती आवश्यक आहे. या आवश्यकतामुळे, postgrespostgresql84 मध्ये संकुल स्तरीय मतभेद निर्माण होऊ शकता व प्रणालीवर फक्त एकच आवृत्ती प्रतिष्ठापीत करणे शक्य आहे.
Samba
Samba फाइल्स्, प्रिंटर्स्, व इतर माहिती शेअर करण्यासाठी, मशीन्स् द्वारे वापरण्याजोगी प्रोग्रामस्चा संच आहे.
Samba3x संकुल मूळपणे 5.4 प्रकाशनात x86_64 सप्लिमेंटरी म्हणून वापरले गेले. Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये, Samba3x सुधारीत केले गेले आहे व आत्ता सर्व आर्किटेक्टर्सवर समर्थीत आहे. Samba3x मध्ये Microsoft® Windows™ 7 इंटरऑपरेबिलिटी करीता समर्थन समाविष्टीत आहे.

Important

क्लस्टर्ड Samba समर्थन अजूनही तंत्रीक पूर्वावलोकन स्तरात आहे व फक्त x86_64 आर्किटेक्चरकरीता उपलब्ध आहे.
Samba3x अपस्ट्रीम Samba 3.3 प्रकाशनवर आधारीत आहे व संरचना फाइल पर्यायमध्ये खालील बदल समाविष्टीत आहे:
घटक वर्णन पूर्वनिर्धारीत
cups जोडणी वेळसमाप्ती नवीन 30
idmap config DOM:व्याप्ती काढून टाकले  
idmap क्षेत्र काढून टाकले  
init लॉगऑन विलंब यजमान नवीन ""
init लॉगऑन विलंब नवीन 100
ldap ssl पूर्वनिर्धारीत बदलले tls सुरू करा
शेअर मोडस् वापरणीत नसलेले  
winbind पुनःजोडणी विलंब नवीन 30
libsmbclient संकुल निर्माण करण्यासाठी samba चे स्रोत घटक पुनःसंरचीत केले गेले आहे. libsmbclient दोन्ही साम्बासाम्बा3x संकुलांमध्ये समाविष्ट केले ज्यामुळे एन्वार्यनमेंटमधील इतर घटकांना क्लाएंट संवाद पुरवला जातो.

Important

Samba3x ची समर्थीत आवृत्ती प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी, पूर्वीच्या सर्व samba3x तंत्रीक पूर्वावलोकन संकुले काढून टाकणे आवश्यक आहे.
gPXE
Red Hat Enterprise Linux 5.5 मध्ये नवीन gPXE संकुल, एक ओपन सोअर्स् प्रिबूट एक्जीक्यूशन एन्वार्यनमेंट (PXE) लागूकरण समाविष्ट केले आहे. gPXE नेटवर्क जोडणी द्वारे प्रतिष्ठापन प्रतिमांना बूट करण्याची सुविधा पुरवतो.

A. आवृत्ती इतिहास

Revision History
Revision 0Tue Nov 24 2009ऱ्यान Lerch
publican सह पुस्तकाचे प्रारंभीक निर्माण